मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब

महत्वकांक्षी रिंग रोड प्रकल्प

स्वता भूमिपुत्र असल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या भूसंपादना संदर्भातील समस्या अथवा अडचणी आणून घेत शासन व भूमीपुत्र यांच्यातील दुवा बनून योग्य तो सुवर्ण मध्य साधला व रिंग रोड प्रकल्पाचे काम जवळ जवळ पूर्ण केले. हा रिंगरोड दुर्गाडी ते टिटवाळा घेवून जात असून आपल्या मतदारसंघातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

प्रकल्पाचा फायदा?

कल्याण आणि डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या फोडण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आणि अतिमहत्वाचा असलेल्या महत्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पाचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. कल्याण लोकसभेचे खासदार हो. श्रीकांत शिंदे साहेब हे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पाठपुरावा करत आहेत. या प्रकल्पासाठी तब्बल 2,186 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रदूषण कमी होणार व आरोग्य सुधारणार तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील टप्पा (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे बिज), टप्पा-5 (गांधारी बिज ते मांडा जंक्शन), टप्पा 6 (मांडा जंक्शन से टिटवाळा जंक्शन), टप्पा (टिटवाळा जंक्शन ते एसएचव 35-40 रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन आणि इतर स्वानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, शहाड, आंबिवली आणि टिटवाळा शहरातील वाहतुकीला नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.