कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांच्या अधिकृत वेबसाईटवर आपले मन:पूर्वक स्वागत!
कल्याण पश्चिममधील सरकारी शाळांना विविध संगणकीय उपकरणे उपलब्ध करून देत या शाळांमध्ये आधुनिकीकरण यावे यासाठी सातत्याने निधी मंजूर करून घेत या शाळांचा विकासात्मक कायापालट केला. १५ विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचा १ ली पासून ते पदवी पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च उचलला.
सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबिवली. रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर अशा शिबीरांमधून लोकपयोगी उपक्रम राबविले. तसेच अनेक कुटुंबियांना आर्थिक मदत करत त्यांना मायेचा आधार दिला.
युवांचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यावर सातत्याने भर दिला. रोजगार मेळावे आयोजित करून हजारो तरूणांना त्यांच्या आवडीची संधी उपलब्ध करून दिली. तसेच कौशल्य विकास शिबीर आयोजित करून व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचे मार्गदर्शन तज्ञांच्या वतीने उपलब्ध करून दिले.
कल्याण पश्चिममधील गावोगावातील महिला बचत गटांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देत बचत गटांना उभारी देण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय महिला गृह उद्योगांच्या माध्यमातून महिला सबलीकरणास हातभार लावला.
आमदार,कल्याण पश्चिम (शिवसेना)
एक सर्वसामान्य शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारणात येतो आणि शाखाप्रमुख हे बहुमानाने मिळालेले पद मोठ्या मेहनतीने समाजकार्य करत जपतो. संघटनेला मोठं करण्यासाठी जीवाचं रान करतो. कल्याणसारख्या शहरात शिवसेनेला रुजवण्यासाठी, घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी पक्षाची नियोजनबद्द बांधणी करतो. हा शिवसैनिक म्हणजे ‘विश्वनाथ भोईर’
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर चालत समाजकार्याचे व्रत घेत विश्वनाथ भोईर यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. स्थानिक भूमिपुत्र, महाराष्ट्र अस्मिता, हिंदुत्ववादी भूमिका, मराठी भाषा यांच्या साठी टोकाचा संघर्ष करत विश्वनाथ भोईर यांनी कल्याण पश्चिममध्ये संघटनेची वज्रमूठ बांधली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वात काम करत शिवसेनेला वाढवली. संघटने विषयीचे प्रेम आणि काम करण्याची ऊर्जा पाहून पक्षाने २०१९ ला थेट आमदारची तिकीट दिली आणि या तिकीटावर कल्याणकरांचा विश्वास जिंकत विश्वनाथ भोईर यांनी विजयावर मोहोर उमटवली. आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, युवा सशक्तीकरण यांसारख्या विषयांवर काम करत आज विश्वनाथ भोईर हे यशस्वीपणे कल्याण पश्चिममध्ये काम करत आहेत.
मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात काम करत आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण पश्चिममध्ये आरोग्य सुविधा आणली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या माध्यमातून हजारो नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली.
कल्याण पश्चिमचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विश्वनाथ भोईर यांनी पायाभूत सुविधांवर भर देत रस्ते, पाणीप्रश्न, वीजप्रश्न अशा अनेक सोईसुविधांवर लक्ष केंद्रीत करत सर्व प्रश्न पुढाकाराने सोडवले.
कल्याण शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहता या शहराची सांस्कृतिक परंपरा जपत आणि सर्वांना सोबत घेऊन विविध सण-उत्सव आणि सांस्कृतिक परंपरा आमदार विश्वनाथ भोईर यांनी मोठ्या अभिमानाने जपल्या.
शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साईभक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे. या साईभक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत करण्यासह शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या दोघा लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे. टिटवाळ्यातील या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली.