मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब

रस्त्यांचे जाळे

मतदारसंघातील रस्त्यांचे जाळे

मी आमदार होण्याआधी कल्याण पश्चिममधील रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला होता. महापालिकेचे हजारो कोटी रुपये रस्त्यांचे डांबरीकरण व खड्डे बुजवण्यात खर्च होत होते. त्यामुळे या प्रश्नावर प्राधान्याने काम करत शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते (गटारे व ड्रेनेजसहित) यांवर लक्ष केंद्रित करून संबंधित रस्ते हे काँक्रिटचे बनवले. हे सर्व रस्ते कॉक्रिटचे केल्यामुळे पुढील किमान 15 ते 20 वर्ष या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न उद्भवणार नाही. जेणेकरुन महापालिकेचा व करदात्या नागरिकांचा कोट्यावधी रुपयांचा निधी वाचेल. दरम्यान येणाऱ्या काळामध्ये उर्वरित रस्त्यांची कामे पुर्ण करण्याचा मानस असून हि कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे.