मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब

सामाजिक कार्य

तरुणांसाठी रोजगार मेळावा

आपल्या मतदारसंघातील सुशिक्षीत बेरोजगार तरुण तरुणींची गरज लक्षात घेऊन गेल्या तीन वर्षांपासून सलग रोजगार मेळाव्याचे मोठ्धा प्रमाणामध्ये आयोजन करत आहोत. ज्याद्वारे आतापर्यंत शेकडो बेरोजगार तरुण तरुणींना त्यांना अपेक्षित अशी नोकरीच्या संधी उपलब्बा झाल्या आहेत. इतकेच नाहीं तर नुकत्याच झालेल्या यंदाच्या रोजगार मेळाव्यात खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसह शासकीय क्षेत्रातील रोजगारही उपलब्ध करून दिले आहेत. आज अनेक युवक युवतींना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपापल्या पायावर उभे राहण्याचे आणि आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे बळ प्राप्त झाले आहे. वाचा तर मनापासून अतीव आनंद आहे.

शैक्षणिक कार्यक्रम

आपल्या मतदारसंघातील होतकरु आणि हुशार विद्यार्थ्यांनी शालेय, महाविद्यालयीन किंवा इतर व्यावसायिक परीक्षांमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशाने शहराचेही नाव मोठे होत असते. त्यामुळे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हे क्रमप्राप्त असून अशा विद्याध्यर्थ्यांचे जाहीर गुणगौरव समारंभांद्वारे कौतुक केले, तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचेही त्यांच्या घरी जाऊन कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि छत्र्यांचे वाटप करत त्यांना सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम

मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या पाहता त्यांच्यासाठी मनोरंजन तसेच विरंगुळा केंद्र उभारण्यात आली आहेत, यासोबतच ज्येष्ठ नागरिक कट्टे, आजी-आजोबा पार्कची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. तर, दर महिन्याला सार्वजनिकरित्या ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसही साजरे केले आत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासह त्यांना शासकिय योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष लक्ष देऊन अनेक उपक्रम आयोजित केले. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवणे व शासनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा