मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब

माझा जनसेवेतील प्रवास

व्यक्तीमत्वाबद्दल

मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब

आमदार,कल्याण पश्चिम (शिवसेना)

एक सर्वसामान्य शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारणात येतो आणि शाखाप्रमुख हे बहुमानाने मिळालेले पद मोठ्या मेहनतीने समाजकार्य करत जपतो. संघटनेला मोठं करण्यासाठी जीवाचं रान करतो. कल्याणसारख्या शहरात शिवसेनेला रुजवण्यासाठी, घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी पक्षाची नियोजनबद्द बांधणी करतो. हा शिवसैनिक म्हणजे ‘विश्वनाथ भोईर’

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर चालत समाजकार्याचे व्रत घेत विश्वनाथ भोईर यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. स्थानिक भूमिपुत्र, महाराष्ट्र अस्मिता, हिंदुत्ववादी भूमिका, मराठी भाषा यांच्या साठी टोकाचा संघर्ष करत विश्वनाथ भोईर यांनी कल्याण पश्चिममध्ये संघटनेची वज्रमूठ बांधली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वात काम करत शिवसेनेला वाढवली. संघटने विषयीचे प्रेम आणि काम करण्याची ऊर्जा पाहून पक्षाने २०१९ ला थेट आमदारची तिकीट दिली आणि या तिकीटावर कल्याणकरांचा विश्वास जिंकत विश्वनाथ भोईर यांनी विजयावर मोहोर उमटवली. आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, युवा सशक्तीकरण यांसारख्या विषयांवर काम करत आज विश्वनाथ भोईर हे यशस्वीपणे कल्याण पश्चिममध्ये काम करत आहेत.

विश्वासू शिवसैनिकाचा झंझावाती प्रवास...!

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आणि ऐतिहासिक वैभव लाभलेलं कल्याण…! कल्याणमध्ये असलेला दुर्गाडी किल्ला, महाराजांनी उभारलेल्या पहिल्या आरमाराची साक्ष देत आजही तटस्थ आणि भक्कमपणे उभा आहे. सुभेदार वाडा, टिटवाळ्याचा महागणपती यांसारख्या अनेक वास्तूंनी नटलेल्या या शहरामध्ये नेहमीच उत्सवांची रेलचेल पाहायला मिळते. येथील नवरात्रौत्सव म्हणजे कल्याणकरांसाठी पर्वणीच जणू…! उल्हास नदीच्या काठावर वसलेलं कल्याण हे नेहमीच सामाजिक व राजकीय चळवळींच्या केंद्रस्थानी राहिलेलं आहे. याच कल्याण तालुक्याला लाभलेली एक अवलिया, दिलखुलास आणि सर्वसामान्य जनतेला हवीहवीशी वाटणारी व्यक्ती आणि हिंदूहृदयसाम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर मा. श्री. आनंद दिघे यांची विचारसरणी जपणारे आपल्या सर्वांचे लाडके कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. विश्वनाथ भोईर साहेब!

कल्याण पश्चिममध्ये असलेल्या उंबर्डे या छोट्याशा गावात श्री. विश्वनाथ भोईर यांचा जन्म झाला. श्री. विश्वनाथ भोईर यांची घरची परिस्थिती तशी हलाखीची आणि बेताचीच! पण ज्यांच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि संकटांना भिडण्याची ताकद असते ते अशक्य परिस्थितीवर मात करतातच! आलेल्या अनेक आव्हानांना दूर सारत विश्वनाथ भोईर यांनी इतिहास व राज्यशास्त्र या विषयात आपले पदवीपर्यंतचं शिक्षण कल्याणमध्येच पूर्ण केले. सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड असलेले श्री. विश्वनाथ भोईर हे हिंदुहृदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर श्री. आनंद दिघे साहेब यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित झाले आणि इथूनच सुरू झाला समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या एका कट्टर आणि विश्वासू शिवसैनिकाचा झंझावाती प्रवास…!

नव्या नेतृत्वाच्या पर्वाचा उदय..!

बिर्ला कॅालेजमध्ये पदवीचं शिक्षण घेत असताना “क्लास रिप्रेझेंटेटिव्ह” या पदासाठी भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे श्री. विश्वनाथ भोईर निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा! इथूनच त्यांना समाजकारणासोबतच राजकारणाचंही बाळकडू मिळायला सुरूवात झाली. शिक्षण संपलं आणि समाजकार्य करणाऱ्या श्री. विश्वनाथ भोईर यांच्या पुढे नोकरीचा गहन प्रश्न उभा राहिला. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एका सच्च्या शिवसैनिक म्हणजेच साबिरभाई शेख हे विश्वनाथ भोईर यांना दिघे साहेबांकडे घेऊन गेले. हाच तो क्षण दिघे साहेब आणि श्री. भोईर यांच्या पहिल्यावहिल्या भेटीचा…! या भेटीमध्येच विश्वनाथ भोईर यांच्यातील नेतृत्त्व कौशल्य ओळखून दिघे साहेबांच्या आदेशाने त्यांनी उंबर्डे येथे शिवसेनेची शाखा उघडली. तसेच दिघे साहेबांचा आदेश शिरोधार्य मानून त्यांनी संघटन कौशल्य दाखवत तरूणांची मोठी फळी शिवसेनेसोबत उभी केली. १९९५ झालेल्या निवडणुकीची जबाबदारी विश्वनाथ भोईर यांनी यशस्वीपणे पार पाडली. हे सर्व पाहून दिघे साहेबांनी १९९६ ला विभागप्रमुख पद तर १९९७ ला कल्याणच्या प्रसिद्ध दुर्गाडी नवरात्रौत्सवाच्या अध्यक्षपदाचा मान विश्वनाथ भोईर यांना दिला.

सांडूनिया अभिमान | निष्काम करती आपुले काम | एक क्षण न घेई विश्राम||

या उक्तीप्रमाणे त्यांनी अक्षरशः स्वत:ला झोकून देऊन पक्षासाठी काम केले. त्यापुढे २००० साली झालेली महानगरपालिका निवडणूक दिघे साहेबांच्या आदेशाने लढवली व विक्रमी मताधिक्याने निवडून देखील आले!!! त्यांच्या कामाचा आवाका एवढा मोठा होता की संपूर्ण कल्याण शहराची जबाबदारीही त्यांनी अगदी लिलया पेलली. परंतु, सर्व काही सुरळीत चालू असताना नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. २००१ साली अनपेक्षितपणे दिघे साहेबांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांचे अंत:करण सुन्न झालं. पण दु:ख आणि नैराश्याच्या या सर्व काळात एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासारखा आधारवड त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आणि मग त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही.

यासोबतच २००९ साली कल्याण उपशहरप्रमुख म्हणून तर २०१४ साली त्यांची शिवसेना शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या नंतर कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेच्या एका नव्या नेतृत्वाच्या पर्वाचा उदय झाला.

ज्यांची खरी सेवा | त्याच्या भय काय जीवा

कोणत्याही पदाची अपेक्षा न करणाऱ्या पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्याला म्हणजेच विश्वनाथ भोईर यांना २०१९ ची निवडणूक जिंकून विधिमंडळाच्या पायऱ्या चढण्याचा, आपल्या कल्याणचं प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला..

आणि बघता-बघता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायला त्यांनी सुरूवात केली. नागरिकांना सुखाचा प्रवास घडावा यासाठी रस्त्यांच्या, उड्डाणपुलांच्या कामासाठी पाठपुरावा केला. त्या दृष्टीने टिटवाळा रेल्वे फाटक पुल, पत्री पुल यांसारखी कामं करण्याचा धडाका विश्वनाथ भोईर यांनी सुरू केला, तेवढ्यातच एका अनाहूत संकटाने अख्ख जग ठप्प झालं.

कोव्हिडची साथ पसरली. लोक निराशेच्या गर्तेत असताना, सोयी सुविधा नसताना, विश्वनाथ भोईर हे अखंडितपणे जनतेसाठी रस्त्यावर उतरून मदत करत होते.

“ज्यांची खरी सेवा | त्याच्या भय काय जीवा” ह्या अंभगाच्या ओळींप्रमाणे विश्वनाथ भोईर हे कोव्हिडच्या महाभयंकर अशा संकटात काम करत होते. खासदार डॅा. श्रीकांत शिंदेच्या सोबतीने त्यांनी डॅाक्टर्स आर्मी उभी केली. मोफत लसीकरण मोहीम, पीपई कीट पुरवणे, स्वखर्चातून औषध पुरवणं, परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीसाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करणे किंवा मग कम्युनिटी किचन, बेड… उपलब्ध करून देणं यासांरख्या अनेक कामांमध्ये विश्वनाथ भोईर अग्रस्थानी होते.

त्यामुळेच मनात कृतज्ञतेचा भाव ठेवून जनतेची संकटकाळी मदत करणारे विश्वनाथ भोईर हे प्रत्येकाला एखाद्या आपल्या घरातल्या व्यक्ती प्रमाणे जवळचे आणि आपुलकीचे वाटतात, हीच त्यांची कमाई…!

महाराष्ट्रात एकनाथ आणि कल्याणमध्ये विश्वनाथ...!!!

कुठल्याही परिस्थितीत हिंदुत्वाशी तडजोड नाही’, ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांची अमूल्य शिकवण आमदार विश्वनाथ भोईर कधीच विसरले नाहीत. म्हणूनच एकनाथजी शिंदे यांच्या सोबतीने त्यांनी हिंदुत्वाची वाट निवडली. आपल्या नीतीमूल्यांना प्रामाणिकपणे जपत काम करणारे आमदार विश्वनाथ भोईर यांनी नेहमीच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. विधिमंडळात सातत्याने आवाज उठवत अन्यायाला वाचा फोडली. वडवली आणि टिटवाळा येथील रेल्वे फाटक पूल तसेच दुर्गाडी आणि पत्री पूलाचे लोकार्पण, मण्याचा पाडा येथे ६० वर्षांनंतर आली स्ट्रीट लाईटची सुविधा, कल्याणमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉँक्रिटीकरण, अद्ययावत सोई सुविधांनी सुसज्ज असणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवीन जलवाहिन्यांसाठी निधी, पाइपलाईनद्वारे गॅस जोडणी, भूमिपुत्रांना घरे, ट्रॅफिकच्या समस्येतून नागरिकांची कायमची सुटका करणारा महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प, दुर्गाडी किल्ल्याची पुनर्रचना, पुनर्बांधणी आणि नूतनीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून विकासित होण्यासाठी प्रयत्न, कल्याणसाठी स्वतंत्र धरणाची मागणी, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा यासारख्या असंख्य कामांचा त्यांनी अक्षरशः धडाका लावला आहे!

आपल्या मतदारसंघातील माता भगिनींसाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” यशस्वीरीत्या राबवली. तसेच विविध बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणांतर्गत शेकडो महिलांना रोजगाराची संधी देखील त्यांनी आजवर उपलब्ध करून दिली आहे. असंख्य खाचखळग्यांनी भरलेल्या वाटांमधून गेली पाच वर्षे आमदार आणि त्याही पलीकडे सदैव समाजाचं हित जपणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा प्रवास झाला आहे. ‘पाच वर्षे प्रगतीची, नांदी नव्या युगाची’ या ओळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्यकाळाचं वर्णन करण्यासाठी अगदी योग्य आणि समर्पक ठरतात. त्यांच्या या प्रवासात त्यांना जीव लावणारी अनेक माणसं भेटली. कल्याणकरांचं प्रेम, आशीर्वाद, जिव्हाळा लाभला! हे संचित म्हणजे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढील दैदीप्यमान वाटचालीसाठी मिळालेली शक्ती आहे, ज्यासाठी कल्याणकरांचे मानावे तितके आभार कमी आहेत.

आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्त्वाखाली राज्यात सत्तेत असलेल्या “महायुती” सरकारने आता कधीच मागे वळून न पहाण्याची शपथ घेऊन आपल्या कामाची घोददौड आजतागायत सुरू ठेवलेली आहे! किंबहुना “पुन्हा महाराष्ट्रात एकनाथ आणि कल्याणमध्ये विश्वनाथ…!!!” ही एकच ओळ प्रत्येक कल्याणकरांच्या आज तोंडी ऐकायला मिळते आहे.

अशाप्रकारे सामान्य माणूस म्हणून सुरू झालेला शिवसैनिक ते कल्याण पश्चिम विभागाचे शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार हा आजवरचा त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवास तसेच कला, क्रीडा, संस्कृती, समाजकारण आदी क्षेत्रात त्यांनी केलेले आजवरचे अद्वितीय आणि भरीव कार्य कल्याणच्या जनतेने आजवर निरखले आणि पारखले आहे! त्यामागे वर्षांनुवर्षांची त्यांची राजकीय तपश्चर्या होती हेही खरेच! या तपश्चर्येचे गोड फळ म्हणूनच जनतेने विश्वास दाखवून त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आमदारपदी बसवले.

त्याचबरोबर त्यांच्या या प्रवासात ज्ञात अज्ञात जीवाभावाचे मित्र आजही त्यांच्यासोबत आहेत. जिल्ह्यातील, तालुक्यातील अनेक समविचारी व ज्येष्ठ मंडळी शिवसेनाप्रमुख स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. श्री. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतरही पक्ष, गट, तट व वयाचा विचार न करता त्यांचे मार्गदर्शक आणि सहकारी म्हणून आजही काम करीत आहेत, ही खरंच कौतुकाची बाब! आणि म्हणूनच आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर आणि त्यांच्या समस्त कुटुंबावर प्रेम करणारी कल्याण मधील जनता, हितचिंतक व युवा वर्गाच्या तुफान पाठिंब्यामुळेच ते पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने जिंकून विजयी होतील यात तीळमात्र शंका नाही!

चला तर मतदार बंधू आणि भगिनींनो, करू इतिहासाची पुनरावृत्ती, आणू पुन्हा "आपलं सरकार, निवडून विश्वनाथ भोईर यांना, करू प्रत्येक स्वप्न साकार…!!!