पायाभूत सुविधा
कल्याण पश्चिम हे एका बेटा प्रमाणे आहे, कारण कल्याण पश्चिम चार बाजु पैकी तीन बाजु ह्या पाण्याने वेढलेल्या आहे व एका बाजूने रेल्वे स्टेशन आहे. ह्या बाबींचा विचार करून कल्याण पश्चिम मतदार संघाला उड्डाण पुलांची किती गरज व महत्व आहे, याचा विचार करता मतदार संघातील दुर्गाडी उड्डाण पूल, पत्रीपूल, मांडा-टिटवाळा उड्डाण पूल, वडवली पूल व प्रस्तावित असणारा उन्नतमार्ग या साठी सतत राज्य शासनाकडे पाठपुरवठा करून ते काम पूर्ण करून घेतले. आपल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहता शहरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशेने उड्डाणपूल आहेत. मात्र, वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्येचा विचार करता है उड्डाणपूल अपुरे पडत असल्याने त्याच शेजारी नवीन प्रशस्त उड्डाणपूल असावेत यासाठी मागील पाच वर्षात आपण पाठपुरावा केला आणि वचननाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार खासदार श्रीकांत शिंदे साहेब व राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करुन नवीन पत्रीपुल, नवीन दुर्गाडी पुल आणि शहाडकडून येण्यासाठी वालधुनी नदीवर नविन उड्डाणपूल बांधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली.
नवीन सिमेंट काँक्रीटचे रस्ते
आपल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात येतील असे आश्वासन आपण आपल्या वचननाम्यात दिले होते, त्यानूसार आपण सुरुवात करत मतदार संघातील प्रमूख रस्त्यांपासून ते अंतर्गत रस्त्यांपर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त होण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात अनेक लहान मोठे रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात आले असून आगामी काळात देखील मतदारसंघातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जाणार आहेत. यामुळे मतदारसंघातील नागरिकांना साईस्कर व आरामदायी प्रवास करता येईल.
आरोग्य सुविधा
आरोग्याला प्राधान्य देत राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा आपल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुरु केला गेला. या आपल्या दवाखान्यामध्ये संपूर्णपणे मोफत उपचार आणि आरोग्य चाचण्या केल्या जात असून आतापर्यंत हजारो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि आजही घेत आहेत. याशिवाय अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून दिला आहे. यामुळे अनेक रुग्णांना आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळाली आहे.
मतदारसंघात नविन जलवाहिन्यांसाठी निधी केला उपलब्ध
पाणी हे मुलभूत गरजेपैकी एक गरज. मात्र, या पाण्यामुळे कुणाला त्रास होऊ नये म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील जलवाहिन्यांवर लक्ष केंद्रीत करत मतदार संघातील जलवाहिन्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच मतदारसंघातील जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलून मतदारसंघात पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी विशेष लक्ष घालून तातडीने नविन जल वाहिन्या टाकण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आगामी काळात हा पाणी प्रश्न कायमचा मिटावा व पाण्या संदर्भातील सर्व समस्या संपुष्टात याव्यात यासाठी देखील मोठ्या प्रमाणात उपाय योजना आखल्या जात आहेत.
घरोघरी पाईप लाईनद्वारे गॅस जोडणीसाठी पुढाकार
मतदार संघातील नागरिकांना घरोघरी येणाऱ्या सिलेंडरपासून मुक्ती मिळावी आणि थेट पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस आपल्या घरापर्यंत पोहोचावा, यासाठी पाईपलाईन द्वारे थेट गॅस जोडणी या कामाला मतदारसंघामध्ये प्राधान्य दिले. पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस जोडणी मतदारसंघात विविध इमारतीमध्ये करून घेतली. आगामी काळामध्ये संपूर्ण मतदारसंघात पाईपलाईन द्वारे गॅस सर्वांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. यामुळे गॅस गळती, गॅस चोरी यांसारख्या समस्यांपासून नागरिकांना मुक्ती मिळणार आहेत. विधासविला माणूस पाच वर्ष प्रगतीची… जाती नव्या युगाची…
शासन आपल्या दारी
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्त्वात राज्यशासनाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या निर्धारित २०० हून अधिक योजनांचा लाभ नागरिकांना एकच ठिकाणी मिळाला. या उपक्रमा अंतर्गत राज्यशासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांनी माहिती उपस्थित सर्व नागरिकांना देण्यात आली.
महिला सक्षमीकरण
आपल्या मतदारसंघातील महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गटामार्फत शेकडो महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. या बचत गटाच्या माध्यमातून या महिला अनेक लहानमोठे व्यवसाय करत आज खंबीरपणे आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनल्या आहेत. महिला बचत गटासोबतच विविध महिला मंडळ स्थापन करुन अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. आपल्या या भगिनींच्या या कार्यकर्तुत्वाला मनापासून सलाम !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्त्वात राज्य सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे. दरमहा महिला भगिणींच्या खात्यामध्ये १५०० रूपये जमा होत असल्यामुळे महिला भगिणींमध्ये दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांना राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी योजनेचे अर्ज भरून घेत हजारो महिला भगिणींना या योजनेचा लाभ मिळवून दिला.
रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी विशेष कार्यक्रम
रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करत या महिला भगिणींचा सन्मान केला. मतदारसंघातील महिला, भगिणींना व त्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ योग्यरित्या मिळतोय का हे पाहण्यासाठी कुटुंब भेट अभियानाच्या माध्यमातून या महिला भगिणींना व त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. तसंच लाडकी बहिण संपर्क अभियानाच्या माध्यमातून या लाभार्थी बहिणींना या योजनेचा फायदा सांगितला.
कल्याण पश्चिममध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
कल्याण पश्चिममध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे या मागणीला आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने यश मिळाले असून या हॉस्पिटलसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सुचनेनुसार पालिकेने गौरीपाडा परिसरात हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडावर तळ अधिक तीन मजली इमारत उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी १०० बेडचे सुसज्ज असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभ राहणार आहे.
स्वतंत्र धरणासाठी पाठपुरावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील लोकसंख्येने आज 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे इतक्या मोठ्या लोकसंख्येला पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखूनच आपण गेल्या तीन वर्षापासून कल्याण ब्रोंबिवलीला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र धरण मिळावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत राज्याच्या अधिवेशनातहीं आपण हा मुद्दा लावून धरला असून राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपली ही मागणी तत्वत मान्य केली आहे. तसेच त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागासह इतर संबंधित अधिकान्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आपल्या पुढाकाराने काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली केडीएमसी आयुक्त आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही संपन्न झाली आहे. त्यामुळे येत्या काळात कल्याण डोंबिवलीकरांना लवकरच स्वतंत्र धरणातून पाणी पुरवठा होईल हा आपल्याला ठाम विश्वास आहे.
मण्याचा पाडा येथे तब्बल 60 वर्षानी आली लाईट
कल्याणमारख्या शहरी भागाच्या जवळ असूनही गेल्या कित्येक दशकांपासून मण्याचा पाडा था आदिवासी वस्तीमध्ये स्ट्रीट लाईटची सुविधा पोहचू शकली नव्हती ज्यामुळे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर हे गाव निर्मनुष्य होऊन जायचे, आपल्या निदर्शनास ही समस्या आल्यानंतर वेळ न दवडता इथल्या भागातील स्ट्रीट लाईटसाठी पालिकेकडे पाठपुरावा करून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला. तसंच या स्ट्रीट लाईट केडीएमसीकडून लावून घेत सुरु करून घेतले. हे स्ट्रीट लाईट सुरु होताच इथल्या ग्रामस्थांनी फटाके फोडून अक्षरशा दिवाळीप्रमाणे आनंद साजरा केला. तर लहान मुलांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. त्यांच्या चेहन्यामील आनंद पाहून आपण खन्या अर्थाने भरून पावलो.
महसुल इमारत बांधणीसाठी विशेष पाठपुरावा करून उपलब्ध केला निधी
कल्याणमध्ये उभे राहणार भव्य महसूल भवन !
कल्याण पश्चिममधील शासकीय महसूल भवन इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून उपलब्ध केला निधी महसूल भवनासाठी तब्बल 14 कोटी 89 लाख रुपयांची तरतूद याच भावनामध्ये तयार होणार तहसील कार्यालय व त्या अनुषंगिक कार्यालये तसेच कोषागार कार्यालय याचसोबत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये अद्ययावत अशी 16 तलाठी कार्यालये विविध परिसरात उभारली जाणार आहेत. या कार्यालयांसाठीही शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून 2 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून घेतली आहे. तसेच या निधीला प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली असल्याने या नव्या तलाठी कार्यालयांचे काम लवकरच सुरु होईल.