मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब

उड्डाणपुलांची निर्मिती

कल्याण पश्चिम हे एका बेटा प्रमाणे आहे, कारण कल्याण पश्चिम चार बाजु पैकी तीन बाजु ह्या पाण्याने वेढलेल्या आहे व एका बाजूने रेल्वे स्टेशन आहे. ह्या बाबींचा विचार करून कल्याण पश्चिम मतदार संघाला उड्डाण पुलांची किती गरज व महत्व आहे, याचा विचार करता मतदार संघातील दुर्गाडी उड्डाण पूल, पत्रीपूल, मांडा-टिटवाळा उड्डाण पूल, वडवली पूल व प्रस्तावित असणारा उन्नतमार्ग या साठी सतत राज्य शासनाकडे पाठपुरवठा करून ते काम पूर्ण करून घेतले. आपल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहता शहरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशेने उड्डाणपूल आहेत. मात्र, वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्येचा विचार करता है उड्डाणपूल अपुरे पडत असल्याने त्याच शेजारी नवीन प्रशस्त उड्डाणपूल असावेत यासाठी मागील पाच वर्षात आपण पाठपुरावा केला आणि वचननाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार खासदार श्रीकांत शिंदे साहेब व राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करुन नवीन पत्रीपुल, नवीन दुर्गाडी पुल आणि शहाडकडून येण्यासाठी वालधुनी नदीवर नविन उड्डाणपूल बांधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली.

वडवली रेल्वे फाटक पुल

वचननाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पासून प्रलंबित राहिलेल्या वडवली रेल्वे फाटक विश्वासठिला माणूस पाच वर्ष प्रगतीची… जाती नव्या युगाची… गेल्या दशकभरा उड्डाणपूलाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. आमदार या नात्याने शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन या वडवली रेल्वे फाटक उड्डाणपूलासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून घेतला. यानंतर कोविडच्या काळात हा उड्डाणपूल पुर्णत्वास येऊन नागरिकांच्या सेवेत रुजू झाला. या उड्डाणपूलामुळे लोकल आणि एक्स्प्रेसचा खोळंबाही दूर झाला आणि विशेष म्हणजे नागरिकांचा त्रास वाचला..

टिटवाळा रेल्वे फाटक पुल

टिटवाळा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल्वे मार्गावरील महत्त्वाचा उड्डाणपूलही आपण पाठपुरावा करून शासनाकडून मंजूर करून घेतला. दरम्यान आता याचे काम पूर्ण झाले असून हा नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. हा पूल पूर्ण झाल्याने हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पत्री पूल

कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेसाठी जोडणारा वाहतुकीचा, दळणळणाचा महत्त्वाचा दुवा असणारा इंग्रज कालीन जर्जर झालेला पत्री पुल तोडून त्याठिकाणी नवीन पत्रीपुल “आई तिसाईदेवी उड्डाणपुल” नावाने उभारुन तो सर्वांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

दुर्गाडी पुल

कल्याणमार्गे भिवंडी व त्यापुढे नाशिक, ठाणे, मुंबई येथे जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला दुर्गाडी खाडीवर प्रशस्त अशा सहा पदरी उड्डाणपुलासाठी सातत्याने पाठपुरावा करुन तो पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.